Thursday, July 30, 2009

वा-यासवे लहरणारी
मुक्त लहर मी
अबोल अव्यक्त फुलणारी.. मुग्ध अबोली मी
आसमंती दरव्ळणारी... कस्तुरी मी
हसणारी, हुरहुरणारी
भिरभिरणारी, थरथरणारी
सोनसळी किरणांची... प्रतिमा मी
मी मुग्धा मी स्निग्धा
चांदणे उधळीत जाणारी....चंदनशलाका
मागे येशील..उडून जाईन कापरासारखी
ये ये म्हणशील.. मुळीच येणार नाही
करशील तू आराधना जेव्हा तपस्वी होऊन
आणशील मला वेड्याचांदण्यातून खेचून
सख्या तुझी, तुझीच रे मी
शुभ्र प्रतिभा !!

मैत्रेयी भागवत१२ जुलै २००८

अवकाशवेध

क्वेसार म्हणजे काय ? कॄष्णविवर कसे बनते ? आपली आकाशगंगा कशी आहे ? अशा किती आकाशगंगा आहेत ? या प्रचंड विश्वात आपले स्थान कोणते ? असे प्रश्न पडत असतील ना ? उत्तरे जाणून घेतांना नेहमीच वाटत आले कि एखादी मराठीतले संकेतस्थळ असते तर कित्ती छान झाले असते.
मराठीतून ही माहिती देणारे एक संकेतस्थळ नुकतेच पाहण्यात आले. या संकेतस्थळाला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्तम संकेतस्थळाचा पुरस्कार देखील मिळालाय..!
अवकाशवेध.कॉम हे त्याचे.कॉम..
कळ देऊ काय ? घ्या....करा सुरूवात अवकाशाच्या प्रवासाची
http://www.avakashvedh.com/index.html