Thursday, July 30, 2009

वा-यासवे लहरणारी
मुक्त लहर मी
अबोल अव्यक्त फुलणारी.. मुग्ध अबोली मी
आसमंती दरव्ळणारी... कस्तुरी मी
हसणारी, हुरहुरणारी
भिरभिरणारी, थरथरणारी
सोनसळी किरणांची... प्रतिमा मी
मी मुग्धा मी स्निग्धा
चांदणे उधळीत जाणारी....चंदनशलाका
मागे येशील..उडून जाईन कापरासारखी
ये ये म्हणशील.. मुळीच येणार नाही
करशील तू आराधना जेव्हा तपस्वी होऊन
आणशील मला वेड्याचांदण्यातून खेचून
सख्या तुझी, तुझीच रे मी
शुभ्र प्रतिभा !!

मैत्रेयी भागवत१२ जुलै २००८

1 comment:

वैभव जोशी said...

chandanshalaakaa ... sundar shabda aahe. Chhan