Friday, August 28, 2009

दमलेल्या बाबासाठी....

( दमलेल्या बाबाची कहाणी या संदीप खरे यांच्या गीतावरून त्यांच्या या कल्पनेला दाद द्यावेसे वाटल्याने
कवीची क्षमा मागून...... )

चार शब्द ऐक बाबा लेकीचेही आता

खुणावती तुला सा-या धावत्या वाटा..


बाबा बाबा थांब थोडा एक माझे जरा
आटू नको देऊ तुझा मायेचा हा झरा
रोजचीच येते रात, आईच्या कुशीत
पाहशील का रे बाबा तिची दमछाक

राबतोस माझ्यासाठी ठावे आहे मला
पुरेसा होई रे तुझ्या हातांचा हा झुला

ना ना ना ना ना ना ना ना,

गर्दीमध्ये चेंगरतो जीव तुझा बाबा
शिणलेल्या श्वासांमध्ये शोधते मी तुला
दमू नको बाबा माझा सांगते देवाला
विसावेल बाबा, थोडा वेळ दे ना त्याला ..


हसणारा खेळणारा, बाबा दे ना मला
बाबा तुझा देवा बघ रागवेल तुला
ऐकले ना माझे जर कट्टी मी घेईन
बाबासाठी लवकर मोठ्ठी मी होईन


पैशाचे रे एक झाड कुंडीत लावीन
माझ्यासाठी माझा बाबा मीच मिळवीन

ना ना ना ना. ना ना ना ना




Maitreyee Bhagwat

3 comments:

Maitreyee said...

ही कविता सर्वप्रथम मुक्तपीठ समूहासाठी संदीप खरे यांच्या कवितेखालीच प्रकाशित केली होती. त्यानंतर काव्यांजली, मराठी कविता, मराठी कविता प्रेमी, संचित एक साठवण या समूहांवर पोस्ट केली. मायबोली या मराठी संस्थळावर देखील प्रकाशित केली आहे. तिथे मला ही कविता माझीच कझीअशी विचारणा झाली.. कुतूहलाने विचारणा केली तेव्हां टाईमपास या संस्थळावर ही कविता नाव न देता पोस्ट केल्याचे आढळून आले.. एक नम्र विनंती आहे.. कविता अशा प्रकारे आवडल्यास ती कुठेही चिकटविण्यास आक्षेप असणार नाही.. फक्त मूळ रचनाकारास त्याचे श्रेय मिळावे ही माफक अपेक्षा आहे !

साधक said...

छान आहे कविता. गुड गुड.

Kaustubh said...

interesting